छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नरच्या मातीतील सुपुत्रांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्यलढ्यात जुन्नरच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला. शिक्षण क्षेत्रात अण्णासाहेब वाघिरे यांच्यासारख्या द्रष्ट्या समाजधुरिणांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालये उभी केली.

लोककलेच्या प्रांतात जुन्नरचे नाव महाराष्ट्रात अग्रभागी आहे. जुन्नरचे अनेक कलावंत, शाहिर आणि साहित्यिक यांनी मराठी संस्कृती संपन्न केली. आज देश-विदेशात आयटी, उद्योग, शासकीय सेवा, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात जुन्नरकर बांधव अभिमानास्पद कामगिरी करत आहेत.