जुन्नर तालुक्यातील प्रत्येक मोठ्या यात्रेत आणि जत्रेत कुस्तीचे जंगी फड भरवले जातात. ओतूर, नारायणगाव, आळेफाटा, बेल्हे, राजुरी, वडगाव आनंद, आपटाळे या भागांतील तालमींमधून अनेक नामांकित पैलवान घडले आहेत ज्यांनी महाराष्ट्र केसरी व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये चमक दाखवली.

कुस्तीबरोबरच मैदानी खेळ, ॲथलेटिक्स, कबड्डी आणि खो-खो या खेळांमध्येही तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदके पटकावली आहेत. दुर्गम आदिवासी घाटमाथ्यावरील धावपटूंमध्ये नैसर्गिक क्षमता असून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे.