किल्ले शिवनेरी हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात असलेला एक अत्यंत ऐतिहासिक व अजिंक्य दुर्ग आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असून माँसाहेबांनी या देवीला नवस केला होता आणि त्यावरूनच बालराजांचे नाव "शिवाजी" ठेवण्यात आले.
शिवनेरी किल्ल्यावर महादरवाजा, पीर दरवाजा, फाटक दरवाजा, कुलंगवाडी दरवाजा, हत्ती दरवाजा आणि शिपाई दरवाजा अशा अभेद्य सात दरवाजांची मालिका आहे. किल्ल्याच्या माथ्यावर शिवकुंज स्मारक, जिजाबाई व बाल शिवरायांचा देखणा पुतळा, जन्मस्थान खोली, बदामी तलाव आणि गंगा-जमुना पाण्याचे टाके आहेत. जुन्नर तालुक्यासाठी शिवनेरी किल्ला हा केवळ एक दुर्ग नसून प्रत्येक जुन्नरकराचा स्वाभिमान आणि श्वास आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी किल्ले शिवनेरीवर झाला. जुन्नर शहराच्या कुशीत वसलेला हा किल्ला अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
हा ऐतिहासिक लेख शेअर करा: